Breaking News

महिलेच्या गळ्यातील पाच तोळ्याचे गंठण लांबविले


संगमनेर शहरातील सार्वजनिक बांधकाम कार्यालयाजवळ एका महिलेच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण चोरून दोघा चोरट्यांनी धुमसटाईलने पोबारा केल्याची घटना रविवारी (दि.२९) दुपारी तीन वाजता घडली. या घटनेमुळे पुन्हा गंठण चोरांनी शहरात डोके वर काढण्यास सुरूवात केली आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिलीप कारभारी साळगट कुटुंबासह शहरातील इंदिरानगर याठिकाणी राहात आहे. रविवारी दुपारी पत्नीसह दोघे जण अल्टो कारमधून भाजीपाला आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर आले. साळगट यांची पत्नी यांनी भाजीपाला घेऊन कारमध्ये बसण्यासाठी आल्या असता त्याच दरम्यान मोटारसायकलवरून मागून आलेल्या दोघा भामट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातील पाच तोळे सोन्याचे गंठण हिसकावून धूमस्टाईलने पोबारा केला