Breaking News

गुजरातमधील पर्यटकांना महाबळेश्‍वरमध्ये स्वच्छतेचा सविनय टोला


सातारा, दि. 12, मे - पर्यटन वाढवताना नियमांची काटेकोर अंमलबजावणी कशी करावे, याचे उत्तम उदाहरण महाबळेश्‍वर पालिकेने घालून दिले. गुजरातमधील पर्यटक महाबळेश्‍वर पर्यटन करायला आले असताना त्यांनी रस्त्याकडेला चूल मांडून पर्यावरणाचे नियम मोडल्यामुळे महाबळेश्‍वर पालिकेच्या वतीने सव्वा दोन हजारांची दंडात्मत कारवाई करण्यात आली. त्यामुळे शहरात स्वच्छतेचा नारा देताना स्वच्छ प्रशासन राबवण्याचे धोरण नगराध्यक्षा स्वप्नाली शिंदे यांनी प्रत्यक्षात अंमलात आणल्याच्या चर्चा जिल्ह्यात रंगल्या आहेत.
महाबळेश्‍वर शहरात गुजरात येथील पर्यटक (जीजे 07 वाय.झेड. 9655) या बसमधून आले आणि रस्त्याकडेला चूल थाटली. लाकूडफाटा गोळा करून रानात पार्टी केल्याप्रमाणे स्वच्छंद हा प्रकार सुरु असताना याची माहीती काही नागरिकांनी पालिकेत दिली. पर्यटकांना सुविधा देण्यासाठी कटीबद्ध असलेल्या महाबळेश्‍वर पालिकेचा देशात लौकिक आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अभियानात हिरहिरीने सहभाग घेणा-या पालिकेत महाबळेश्‍वर पालिकेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. मात्र, नियमनही पायमल्ली करणा-यांना वेळीच रोखण्याचे औदार्य दाखवण्याची तत्परता ही हवी. नगराध्यक्षा शिंदे यांनी कारवाईचे आदेश दिले.