Breaking News

नेहरू वसतिगृहाची फी वाढ मागे घ्या ; विद्यार्थ्यांची मागणी


सोलापूर, दि. 12, मे - ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी सोईचे असलेल्या नेहरू वसतिगृहाची फी वाढ करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला. तब्बल साडेतीन हजार रुपये शुल्क ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने फी वाढ मागे घ्या, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. 

गेल्या आठवड्यात झालेल्या जिल्हा परिषद शिक्षण समितीच्या बैठकीत नेहरू वसतिगृहाची फी अडीच हजार ऐवजी साडेतीन हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला. गेल्या दोन वर्षांपासून वसतिग ृहाच्या शुल्कात झपाट्याने वाढ झाली आहे. पुन्हा नवीन शुल्कवाढ ग्रामीण विद्यार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे शुल्कवाढ मागे घ्या, अशी लेखी मागणी विद्यार्थ्यांनी अध्यक्ष संजय शिंदे यांच्याकडे केली. व्यापार्‍यांना भाडेवाढ करा : वसतिगृहाच्या खालील बाजूस 16 व्यापारी गाळे आहेत. त्यापैकी काहींची नियमित भाडेवसुली होत नाही. तसेच, व्यापारी गाळ्यांना व्यावसायिक दराने भाडेवसुली करून व्यवस्थापन खर्चाची तूट भरुन काढावी, अशी मागणी सदस्य सुभाष माने यांनी केली. सर्वसाधारण सभेत त्याबाबत प्रश्‍न उपस्थित करून शुल्कवाढीचा प्रस्ताव रद्द क रण्यासाठी निश्‍चित प्रयत्न करू, असे काही झेडपी सदस्यांनी सांगितले.