चंद्रकांत दादा पाटील यांच्या कारकिर्दीला खासगी सचिवांच्या कार्यशैलीचा अपशकून
मुंबई/ विशेष प्रतिनिधी - महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागात वाढलेल्या भ्रष्टाचाराला मंत्र्यांच्या खासगी सचिवांची मनमानी कारणीभूत असल्याच्या चर्चेला गेल्या चार वर्षातील श्रीनिवास जाधव यांच्या क ार्यशैलीने शिक्कामोर्तब केले आहे. छगन भुजबळ यांच्या काळात मलिकनेर आणि चंद्रकांत दादा पाटील यांच्या काळात श्रीनिवास जाधव या दोघांची कार्यशैली साबांकारच्या कार्यप्रणालीत राहु केतूच्या भुमिकेत वावरत असल्याने अनियमिततेपासून प्रत्यक्ष भ्रष्टाचाराच्या दलदलीत अडकलेल्या अभियंत्यांचे मसिहा म्हणून हे मंञ्यांचे खासगी सचिव भ्रष्ट लॉबीत लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. पदनामाप्रमाणे या मंडळींचे उद्योगही खासगीत रंग भरू लागले आहेत. दरम्यान चंद्रकांत दादा पाटील यांच्या सारख्या कार्यक्षम आणि मुख्यमंत्र्यांच्या पारदर्शक कारभाराचे ओझे खांद्यावार वाहणार्या मंत्र्यांचे राजकीय जीवन ही मंडळी कलंकीत करीत असून श्रीनिवास जाधव यांची सातारा प्रमुख म्हणून वादग्रस्त ठरलेली कारकिर्द चर्चेत आली आहे. एकूणच आगार प्रमुख म्हणून केलेल्या भ्रष्टाचारासह सार्वजनिक बांधकाम विभागातील भ्रष्टाचारातून श्रीनिवास जाधव यांनी अफाट संपत्ती कमावल्याची शंका व्यक्त केली जात असून अंमलबजावणी संचालनामार्फत (इडी) श्रीनिवास जाधव यांची झाडाझडती झाल्यास ऑर्थर मध्ये एक बरेक जाधवांसाठी आरक्षित करावा लागेल, अशी चर्चा होत आहे.
सध्या मुंबई सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागात सुरू असलेली भुजबळकालीन भ्रष्ट परंपरा चंद्रकांत दादा पाटील यांच्या काळातही कायम ठेवण्यात बांधकाम मंत्र्यांचे खासगी सचिव श्री निवास जाधव यांनी साम-दाम-दंड-भेद नितीचा वापर करून मोलाचे योगदान दिले. जेव्हा मुंबई साबां प्रादेशिक विभागातील शहर इलाखा, मध्य मुंबई आणि अन्य साबां मंडळातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला तेंव्हा शासनपातळीवरून झालेल्या चौकशीत दोषी आढळलेल्या कार्यकारी अभियंता, सह अभियंता आणि कंत्राटदार या साखळीतील भ्रष्ट चेहर्यांना अभय देण्यासाठी अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी श्रीनिवास जाधव यांच्या सहयोगाने लावलेली ताकद चंद्रकांत दादा पाटील यांच्या मंत्रीपदाची कारकिर्द छगन भुजबळांच्या कारकिर्दीशी स्पर्धा करण्यास कारणीभूत ठरली.
अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी हे श्रीनिवास जाधव यांचे खास खबरी म्हणून साबांत परिचीत असून कंत्राटदारांची माहीती सुर्यवंशी पुरवित असल्याचा संशय आहे, दुसर्या बाजूला कं त्राटदारांनी अटी शर्तींना अधीन राहून काम पुर्ण केले असले तरी त्यांची देयके अदा करण्यात श्रीनिवास जाधव यांचा हस्तक्षेप असल्याचा प्रचार अरविंद सुर्यवंशी करीत असल्याचीही कुणकुण आहे.