Breaking News

आरक्षण संपुष्टात आल्यास बहुजनांचे अधिकार धोक्यात : सावित्रीबाई फुले

नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश लोकशाही धोक्यात असल्याची भीती व्यक्त करतात. काही जण संविधान बदलण्याची तसेच आरक्षण हटविण्याची भाषा करतात. त्यामुळे देशातील संविधान आणि आरक्षण नष्ट झाल्यास केवळ बहुजन समाजाचे नव्हे, तर देशातील नागरिकांचे अधिकार संपुष्टात येतील अशी भीती, भाजप खासदार सावित्रीबाई फु ले यांनी व्यक्त केली. खासदार फुले यांनी काही दिवसांपूर्वीच दलितांच्या घरी जाऊन जेवण घेणे हा ‘फेक शो’ असल्याची घणाघाती टीका केली होती. तसेच अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाविषयी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर त्यांनी घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. सावित्री बाई फुले या उत्तर प्रदेशातील राजकारणी आणि दलित-सामाजिक कार्यक र्त्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून बहराईच जिल्ह्यातील बलहा येथून निवडणूक लढविली आणि 16 व्या लोकसभेच्या सदस्या बनल्या.