Breaking News

चिदंबरम यांनी विदेशात गुंतवला पैसा : निर्मला सीतारामन

नवी दिल्ली : आपल्या विदेशातील मालमत्तेचा हिशोब न देणारे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्याविरुद्ध काँग्रेसने काहीच कारवाई केली नसल्याचा आरोप केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केला. स्वतःच एका आर्थिक खटल्यावरून जामीनावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी चिदंबरम यांच्या विदेशातील मालमत्तेविषयी काँग्रेस चौक शी करणार की नाही, हे स्पष्ट करायला हवे असेही सीतारामन यांनी यावेळी सांगितले. चिदंबरम व त्यांच्या कुटूंबीयांनी विदेशात मोठ्या प्रमाणात गुंतवलेल्या पैशावरुन आयकर विभागातर्फे सतत त्यांची विचारपूस होत असल्याच्या बातम्या आपण माध्यमांतून पाहत आहोत. आपल्या विदेशातील संपत्तीचा खुलासा न केल्याने ज्याप्रमाणे पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने नवाझ शरीफांना पायउतार केले त्याप्रमाणे चिदंबरम यांच्यावरही कारवाई व्हायला हवी, असे सीतारामन यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले.
मोदी शासनाने लागू केलेल्या काळ्या पैशाच्या नियमांचे उल्लंघन करुन चिदंबरम यांनी 14 देशांमधील 21 बँक खात्यांमध्ये एकूण 3 अब्ज रुपयांच्या जवळपास पैसा साठवून ठेवला आहे, अशी माहिती सीतारामन यांनी दिली.