अपहृत भारतीयांची सुखरुप सुटका व्हावी : संयुक्त राष्ट्र
नवी दिल्ली : अफगाणिस्तानात रविवारी अपहरण करण्यात आलेल्या 7 भारतीय अभियंत्यांच्या सुखरुप सुटकेबद्दल संयुक्त राष्ट्राने स्वतःची प्रतिबद्धता व्यक्त केली. अफगाणच्या उत्तर बागलान प्रांताच्या चश्मा-ए-शेर भागातून दहशतवाद्यांनी 7 भारतीयांचे अपहरण केले होते. सर्व अपहृत भारतीय कंपनी केईसी ररर लिमिटेडचे कर्मचारी आहेत. अफगाणिस्तानात वीज पुरवठा करणाऱया महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये केईसी इंटरनॅशनलचा समावेश होतो.सर्व भारतीय अभियंते एका ऊर्जा उपकेंद्राच्या निर्मितीकार्याचे निरीक्षण करण्यासाठी गेले होते. भारतीय विदेश मंत्रालयाच्या प्रवक्त्यानुसार अफगाणिस्तानातील विविध प्रकल्पांवर सुमारे 150 अभियंते आणि तंत्रज्ञ विविध प्रकल्पांवर काम करत आहेत.