सैन्य भरतीत घोटाळाप्रकरणी 34 सैनिकांविरूद्ध गुन्हा दाखल
लखनौ - देशात परीक्षांशी संबंधित घोटाळ्यांचे सत्र सुरूच आहे. सीबीएसई, स्टाफ सिलेक्शन कमिशननंतर भारतीय सैन्यातील भरती घोटाळा उघडकीस आला आहे. याप्रकरणी कें द्रीय अन्वेषण विभागाने 41 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यात सैन्यात विविध विभागात काम करणार्या 34 सैनिकांचा समावेश आहे. लखनौ सैन्य मुख्यालयात 2016मध्ये भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. त्यावेळी 34 उमेदवारांनी बनावट डोमिसाईल सर्टिफिकेट सादर केल्याचे तपासणीअंती समोर आले होते. हमीरपूर उपजिल्हाधिक ार्यांच्या सहीनिशी प्रमाणपत्रे बनविण्यात आली. केंद्रीय अन्वेषण विभागाने प्रकरणाची पाळेमुळे शोधून काढली आहे.