श्री स्वामी समर्थ पतसंस्था बंद करा; जिल्हा उपनिबंधकांनी दिले चौकशीचे आदेश
श्रीगोंदा / प्रतिनिधी
काष्टी गावातील श्री स्वामी समर्थ पतसंस्था बंद करण्यात यावी, अशी मागणी आर.के उद्योग समूहाचे राजेंद्र पाचपुते यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांचेकडे केली आहे,
यामध्ये राजेंद्र पाचपुते यांनी व्यवसायासाठी रक्कम 15 लाख रक्कम सीसी स्वरूपात घेतली होती, 2 ते 3 वर्षानंतर सीसी हा प्रकार पूर्णपणे बंद करत आहोत, त्यामुळे यापुढे संस्थेकडून तुम्हाला टर्म लोन घ्यावे लागेल असे सांगण्यात आले. मागील व्यवहार नवीन-जुना पद्धतीने पूर्ण करून देऊ असे सांगून माझे 20 लाख रुपये रकमेचे टर्म लोन केले , जुनी सीसी पूर्ण करण्यासाठी मला रुपये 17,50,141 भरणे होते परंतु सदर संस्थेने माझ्याकडून 18,27,976 रुपये चलनाने भरून घेतले, यामध्ये माझी संस्थेकडून 77,835 रुपये अधिक घेवून वरील रकमेची फसवणूक केली, अशा प्रकारचे गैरव्यवहार अनेक सभासदांचे, कर्जदारांचे घडल्यामुळे माझ्या खात्याचे स्टेटमेंट मागितले.परंतु स्टेटमेंट देण्यास संस्थेने टाळाटाळ करत उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली, यावरून खात्यामध्ये संस्थेने गैरव्यवहार केल्याचा विश्वास बसला. त्यामुळे संबंधितांनी सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांचेकडे तक्रार केली. त्यांनतर सहाय्यक निबंधक खेडकर त्यांच्या सांगण्यावरून खात्याचे स्टेटमेंट मिळाले, सदर स्टेटमेंट पडताळून पाहून, त्यामध्ये 77,835 रुपये जास्त भरून घेतल्याचे निदर्शनास आले, सदर रक्कम चुकून जास्त गेल्याचे वाटल्यामुळे सदर प्रकाराबाबत संस्थेमध्ये विचारणा सुरू केली, त्यावर त्यांनी फसवणूक केली नसल्याचे सांगून तुमच्याकडे पैसे भरल्याची पावती असल्यास घेऊन या असे सांगण्यात आले. असणार्या पावती त्यांना दाखवल्यानंतर, त्यावर त्या पावती बनावट असल्याचे सांगितले. त्यावेळी माझी पूर्ण फसवणूक झाल्याची खात्री झाली, मधील काळात संस्थेमध्ये असे अनेक गैरव्यवहार झाल्याच्या चर्चा पुराव्यासहित पहावयास मिळाल्या. वारंवार फसवणूक केलेली रक्कम मागितली, परंतु स्पष्ट देणार नसल्याचे सांगण्यात आले. याउलट तुला कुठे तक्रार करायची तिकडे कर असा सज्जड दमही देण्यात आला. आपण सहाय्यक निबंधक श्रीगोंदा यांचेकडे पुन्हा तक्रार करणार असल्याचे सांगितल्यानंतर पालकमंत्री माझा जवळचा पाहुणा आहे. कोणी माझें काही करणार नाही, असे सांगितले, माझ्यासह अनेकांची वेगवेगळ्या मार्गाने फसवणूक केल्याप्रकरणी राजेंद्र पाचपुते यांनी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था अहमदनगर यांचेकडे लेखी अर्जाद्वारे सदर संस्था बंद करण्याची मागणी केली, त्यावर जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सर्व पुरावे पाहून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.