Breaking News

ट्रेनमध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्यास रेल्वे प्रशासन भरपाई देणार

नवी दिल्ली : ट्रेनमध्ये चढता-उत्तरताना एखाद्या प्रवाशाच्या मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याची जबाबदारी रेल्वे प्रशासनाची असेल, असे सुप्रिम कोर्टाने स्पष्ट केले आहे. प्रवाशाच्या निष्काळजीपणाचे कारण देत रेल्वे प्रशासन आपली जबाबदारी झटकू शकत नाही, असे सुप्रिम कोर्टाने सुनावले.

प्रवाशांची हलगर्जी अपघाताला कारणीभूत असल्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून भरपाई मिळू शकत नाही, असं काही निकालांमध्ये म्हटलं होतं. तर काही प्रकरणांमध्ये रेल्वे प्रशासनाला भरपाई देण्याचे आदेश देण्यात आले होते. अखेर सुप्रीम कोर्टाने बिहारमधील प्रकरणाचा निकाल देताना हा संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न केला. तिकीट नसलं तरी एखाद्या प्रवाशाला रेल्वे प्रशासन भरपाई नाकारु शकत नाही, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. भरपाईचा दावा सिद्ध करण्यासाठी प्रवासासंदर्भातील अन्य पुरावे सादर करणे गरजेचे असतील. अपघात हा प्रवास सुरु असताना किंवा प्रवासानंतर टेनमधून उतरतानाही होऊ शकतो. स्टेशन परिसरात होणाऱया अपघातांमध्ये रेल्वे प्रशासनाला भरपाई द्यावी लागेलच, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलं. बिहारमधील करौता ते खुसरुपूर प्रवासादरम्यान 2002 मध्ये एका प्रवाशाचा टेनमधून पडून मृत्यू झाला होता. संबंधित प्रवासी सेकंड क्लासमधून प्रवास करत होता. पतीच्या मृत्यूनंतर भरपाईसाठी पत्नीने रेल्वे प्रशासनाकडे धाव घेतली होती.