Breaking News

राष्ट्रीय साॅफ्ट बाॅल स्पर्धेत ‘संजीवनी’चा समावेश : कोल्हे

कोपरगाव शहर प्रतिनिधी - नॅशनल साॅफ्ट बाॅल असोसिएशन आॅफ इंडियाच्यावतीने आर्मोर निजामाबाद (तेलंगना राज्य) येथे घेण्यात आलेल्या आठव्या सब ज्युनियर राष्ट्रीय साॅफ्ट बाॅल स्पर्धेत महाराष्ट्राच्या १२ वर्षे आतिल मुलांच्या संघात येथील संजीवनी अकॅडमीचा समावेश झाला, अशी माहिती स्कूलच्या संचालिका मनाली कोल्हे यांनी दिली. 

त्या म्हणाल्या, संजीवनी अकॅडमीचा चैतन्य नानासाहेब लोंढे, १२ वर्षे आतील मुलींच्या संघात आदिती सुनिल फडे आणि १० वर्षे आतील मुलांच्या संघात श्रेयस चंद्रशेखर कासले यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून खेळाचे मैदान गाजविले. अकॅडमीच्या या राष्ट्रीय यशाबद्दल संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी या तीनही खेळाडूंसह प्राचार्या श्रीनिला काला, राष्ट्रीय दर्जा प्राप्त संजीवनी अकॅडमीचे निष्णात कोच विरूपक्ष रेड्डी यांचा सत्कार करून त्यांचे कौतुक केले. संजीवनी शालेय जीवनात विद्यार्थी निरागस असतात. त्यांच्यावर जसे रूजविले जाते. ते दिर्घ काळ टिकते, हे मानसशास्त्र असून या संकल्पनेला अनुसरून संजीवनी अकॅडमी ही विद्यार्थ्यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्व घडविण्यासाठी प्रयत्नशील असते, असे कोल्हे शेवटी म्हणाल्या.