Breaking News

मुकींदपूरमधून गायकवाड यांचा अर्ज दाखल

नेवासाफाटा प्रतिनिधी - तालुक्यातील मुकींदपूर येथील दि. २७ मे रोजी होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या जागेसाठी भाऊसाहेबनगर प्रभागातील युवा सामाजिक कार्यकर्ते कमलेश गायकवाड यांनी आज {दि. १२} उमेदवारी अर्ज सादर केला. यावेळी प्रविण साळवे, संजय साळवे, अक्षय साळवे, सुभाष साळवे, दीपक बनकर, राजू दळवी, बबलू साळवे, अशोक दळवी आदी उपस्थित होते. निवडणूक अधिकारी जगताप यांच्याकडे अर्ज सुपूर्त करण्यात आला. मुकिंदपूर ग्रामपंचायतीची निवडणूक दि. २७ मे रोजी होत आहे. सरपंचपदाची जागा ही सर्व साधारणसाठी आरक्षित आहे.