Breaking News

सातार्‍यात भरदिवसा गोळीबार; बंदुकीची गोळी लागल्याने युवती गंभीर

सातारा, दि. 31 (प्रतिनिधी) : बुधवार नाका येथे आज सायंकाळी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अश्‍विनी कांबळे (रा. बुधवार पेठ) ही गोळी लागल्याने गंभर जखमी झाली. भर दिवसा झालेल्या गोळीबाराच्या प्रकारामुळे सातारा शहर परिसरात खळबळ उडाली.


याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवार नाका येथील समाज मंदीराजवळ अरिहंत जनरल स्टोअर्स या नावाचे दुकान आहे. त्याच परिसरात अश्‍विनी कांबळे ह्या राहतात. नुक ताच तिचा विवाह ठरला होता. त्या त्यांच्या भावाच्या लहान मुलाला घेऊन दुकानाकडे निघाल्या होत्या. त्यावेळी रिक्षातून आलेल्या एका युवकाने दुकानाजवळ उभ्या असलेल्या दुसर्‍या युवकाच्या दिशेने गोळीबार केला. मात्र, त्याचा नेम चुकल्याने बंदुकीची गोळी अश्‍विनी यांच्या छातीत घुसली. त्यामुळे ती मुलासह रस्त्यावर कोसळल्या. गोळीबाराच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. तोपर्यंत गोळीबार करणारी अज्ञात व्यक्ती पसार झाली.
परिसरातील नागरिकांनी रक्ताच्या थोराळ्यात पडलेल्या अश्‍विनी यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना तातडीने सातार्‍यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले. गोळीबार करणार्‍यांचे तसेच कोणावर गोळीबार करायचा होता त्याचे नाव अद्याप समजू शकले नाही. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा बुधवार पेठेत दाखल झाला आहे.
-----------------------------------------