उत्तर प्रदेशच्या कैराना लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा धक्का
कैरानात मतमोजणीच्या 21व्या फेरीची गणना पूर्ण झाली आहे. राष्ट्रीय लोकदलाच्या उमेदवार तबस्सुम हसन यांना 4 लाख 21 हजार 145 मतं मिळाली. भाजपचे मृगंका यांना 3 लाख 71 हजार 691 मतं मिळाली. तबस्सुम हसन या 49454 मतांनी मृगंका यांच्या पुढे आहेत.