Breaking News

दखल - भाजपचं नाक कापलं

भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून आतापर्यंत झालेल्या 27 पोटनिवडणुकांत भाजपला अवघ्या चार जागा जिंकता आल्या, तर भाजपच्या ताब्यातील दहा जागा अन्य पक्षांनी जिंकल्या. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेससह विरोधी पक्ष पोटनिवडणुकीपुरते उरले असल्याची टीका केली असली, तरी भाजपला धक्का देता येऊ शकतो, हे पोटनिवडणुकीतील निकालानंच दाखवून दिलं आहे. उत्तरप्रदेश, राजस्थान व मध्य प्रदेशातील निवडणुकीचे निकाल तर भाजपला पुढच्या वर्षी होणार्‍या लोकसभेच्या निवडणुकीची चिंता करायला लावणारे आहेत.
.................................................................................................................................................
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर स्टार प्रचारक म्हणून उल्लेख केला जातो; परंतु त्यांना स्वतः च्या गोरखपूर मतदारसंघात भाजपला निवडून आणता येत नाही, हे जे चित्र पुढं आलं आहे, ते खचितच योग्य नाही. भाजपचं कडवं आव्हान पेलायचं असेल, तर एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही, हे विरोधकांना समजलं आहे. एकदिलानं एकत्र आलं, तर भाजपचा पराभव करता येऊ शकतो, हे गोरखपूर, फुलपूर, कैराना आणि भंडारा-गोंदिया मतदारसंघातील निवडणूक निकालानं दाखवून दिलं आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते हुकूम सिंह यांच्या निधनामुळं कैराना लोकसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. गेल्या वर्षी याच हुकूम सिंह यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत कैरानामध्ये हिंदूंवर अत्याचार होत असून त्यांना स्थलांतर करावे लागते आहे, असा कांगावा केला होता. मुझफ्फरनगर दंगलीतून जसं मतांचं धु्रवीकरण झालं, तसं कैराना प्रकरणातून करण्याचा त्यांचा प्रयत्न होता; परंतु माध्यमांनी हा आरोप गांभीर्यानं घेतला. कैरानात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, तेव्हा तिथं हिंदू व मुस्लिम अतिशय गुण्यागोविंदानं नांदत आहेत, असं दिसलं होतं.
कैराना मतदारसंघात भाजपनं हुकूम सिंह यांची मुलगी मृगांका सिंह यांना उमेदवारी दिली होती. त्यांच्याविरोधात राष्ट्रीय लोकदलाकडून तबस्सूम हसन या रिंगणात होत्या. हसन यांना काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानं पाठिंबा देत भाजपला आव्हान दिलं. गोरखपूर आणि फुलपूरच्या परभवानंतर कैरानाचा पराभव भाजपसाठी धक्क ादायक मानला जात आहे. कैरानामध्ये एकूण 17 लाख मतदार आहेत. या मतदारसंघात मुस्लीम, जाट व दलितांचं प्रमाण जास्त आहे. गेल्या वेळी भाजपनं जसा मतांच्या धु्रवीक रणाचा उपयोग करून घेतला, तसाच उपयोग भाजपवर नाराज असलेल्या गटांच्या एकत्रिकरणासाठी विरोधकांनी करून घेतला. गोरखपूर व फुलपूरमध्ये विरोधकांच्या संयुक्त उमेदवारांनी भाजपचा पराभव केला होता. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी या भागात जोरदार प्रचार केला होता. गोरखपूर आणि फुलपूरची पुनराव ृत्ती कैरानात झाल्यानं उत्तर प्रदेशात भाजपचं नाकच कापलं गेलं आहे. या मतदारसंघातील निकाल लोकसभेच्या 2019 च्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरेल. नाना पटोले यांनी पक्षनेतृत्वावर टीका करत खासदारकीचा राजीनामा दिल्यामुळं गोंदिया-भंडारा लोकसभा मतदारसंघात निवडणूक झाली. भाजपनं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. परंतु, मुख्यमंत्री फडणवीस, कें द्रीय मंत्री नितीन गडकरी व सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मक्तेदारीला शह देत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकली. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून मधुकर कुकडे हे उमेदवार होते, तर भाजपनं हेमंत पटले यांना उमेदवारी दिली होती. नाना पटोले यांनी कुकडेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. नाना पटोले आणि भाजपसाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची के ली होती. यात अखेर नाना पटोले यांनी बाजी मारली. महाराष्ट्रातील दोन लोकसभा मतदासंघात पोटनिवडणूक होती. भाजपला त्यातील पालघरची एकच जागा राखता आली. मतदानापूर्वी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीत मधुकर कुकडे हे उमेदवार नसतील अशी घोषणा केली होती. त्यांच्या या वक्तव्याचा राष्ट ्रवादीला फटका बसेल अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात आली होती. परंतु, हा अंदाज खोटा ठरला आणि कुकडे अखेर विजयी ठरले.
भाजप-शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेची ठरलेल्या पालघर पोटनिवडणुकीत अखेर भाजपनं बाजी मारली. राजेंद्र गावित यांनी आपले निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे उमेदवार आणि भाजपचे दिवंगत खासदार चिंतामणी वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास यांचा 29,572 मतांनी पराभव केला. श्रीनिवास वनगा यांना उमेदवारी दिल्यामुळं भाजप आणि शिवसेनेतील संबंध ताणले गेले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑडिओ क्लिप प्रसारित करून शिवसेनेनं प्रचारात रंगत आणली होती. पण याचा शिवसेनेला फायदा झाला नाही. ऐनवेळी काँग्रेसमधून भाजपत आलेले राजेंद्र गावित हे विजयी झाले. शिवसेनेचे श्रीनिवास वनगा हे दुसर्‍या क्रमांकावर राहिले तर बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव हे तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले. भाजपनं प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनाही आणलं होतं. विशेष म्हणजे शिवसेना पहिल्यांदाच पालघर निवडणुकीत उतरली होती. त्यांनी भाजपला चांगली लढत दिली. लोकशाहीचा खून करून भारतीय जनता पक्षानं पालघरमध्ये विजय संपादन केल्याची प्रतिक्रिया शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भाजपनं निवडणूक यंत्रणा अत्यंत बेकायदेशीररीत्या वापरल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारी यंत्रणा वापरणं, पैशाचं वाटप करणं, निवडणूक अधिकारी आपल्याला पाहिजे तसं वापरणं असे सगळे प्रकार भाजपनं केल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे. या निवडणुकीच्या निकालानं शिवसेना-भाजपतील दरी आणखीच वाढली असली, तरी शिवसेनेनं सत्तेला चिकटून राहणंच पसंत केलं आहे. लोकसभेच्या चारपैकी दोन व विधानसभेच्या 11 पैकी एक जागा भाजपला जिंकता आली. काँग्रेसनं विधानसभेच्या पाच, झारखंड मुक्ती मोर्चा, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दलानं त्यांच्या त्यांच्या राज्यातील जागा जिंकल्या. राष्ट्रवादीनं लोकसभेची थेट भंडार्‍याची जागा जिंकल्यानं आता त्यांना क ोल्हापूरपासून नागपूरपर्यंत आपला पक्ष आहे, असं सांगण्याची सोय झाली.