Breaking News

‘प्रियदर्शनी’चा निकाल ९४. ३१ टक्के


कोपरगांव : प्रतिनिधी

येथील प्रियदर्शनी ग्रामीण महिला मंडळ लोणी संचलित नामदेवराव परजणे पाटील कला, विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय या कनिष्ठ महाविद्यालयाचा बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये विज्ञान शाखेचा एकूण निकाल हा ९४.३१ टक्के लागला आहे. प्रनौती रामदास तुवर ही विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक मिळवून विज्ञान शाखेत प्रथम आली. 

या परीक्षेत अदिती कुमार नाईक व निकिता ज्ञानेश्वर चांदर या विद्यार्थिनींनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक संपादन केला.

वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९४. ६२ टक्के लागला. मोहिनी गोपीनाथ गायकवाड व मोनाली आसाराम दुघड या वाणिज्य शाखेत पहिल्या आल्या. तसेच समृद्धी भाऊलाल शिंदे व लता पंढरीनाथ वाळूंज यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. महाविद्यालयाचा एकूण निकाल ९४. ४७ टक्के निकाल लागला.

सर्वच यशस्वी विद्यार्थिनींना कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा. दत्तात्रय सोनवणे, प्रा. शबनम पटेल, प्रा. श्रीरंग वाघ, प्रा. शैलेश कुलकर्णी, प्रा. माया दवणे, प्रा. भारती करपे, प्रा. रंजना बारगळ , प्रा. आनंद शिंदे, प्रा. सोमनाथ सूर्यवंशी, प्रा. पूनम जिभकाटे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थिनीच्या या यशाबद्दल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे, जि. प. शिक्षण समिती सदस्य व महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी राजेश परजणे, संस्थेचे सचिव प्रा. डॉ. ए. एस. पुंड, महाविद्यालयाच्या प्रशासकीय अधिकारी सुनीता कदम यांनी अभिनंदन केले.