Breaking News

बिडवे यांना समाजरत्न पुरस्कार प्रदान

कोपरगाव शहर प्रतिनिधी

समाजाच्या विकासात योगदान देत असलेले आणि नाभिक समाजासाठी विविध सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल येथील किरण बिडवे यांना नुकताच समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. गणेश कला, क्रिडा रंगमंच, पुणे येथे खा. अमर साबळे, नाभिक महामंडळाचे राज्याध्यक्ष भगवान बिडबे, दत्ता अनारसे, बंडोपंत राऊत, गणेश यादव, नंदकिशोर वर्मा, जगदीश नाई आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पुरस्कारप्राप्त बिडवे यांनी नाभिक समाजाची एकजूट करून समाजाचे दैवत श्री संत सना महाराजांचे मंदिर आणि ग्रामीण भागातील नाभिक समाजाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणाकरिता वस्तीगृह उभारणी केली. समाजबांधवांच्या विविध अडीअडचणी सोडविण्याचा उपक्रम बिडवे यांनी राबविल्याने त्यांना हा समाजरत्न पुरस्कार देण्यात आला.

याप्रसंगी मारूती टिपुगडे, अंकुश खडके, दिलीप जाधव, सोमनाथ व्यवहारे, राजेंद्र कोहकडे, दत्तात्रय आहेर, सचिन वैद्य, मनोज बिडवे, संजय सोनवणे, मुकूंद जाधव, गोपीनाथ जाधव, गोरख वैद्य, कचेश्वर कदम, दीपक चव्हाण, रमेश आहिरे, विनायक खंडांगळे, पप्पू निकम, विनायक बडवे, सुरेश कदम, गणेश बडवे, विलास अनर्थे, गणेश वाघ, आदीनाथ वाघ, प्रविण आहेर, एकनाथ बोरसे आदी उपस्थित होते.