डॉ. शिल्पा भागवत पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण
राहुरी विशेष प्रतिनिधी
येथील डॉ. शिल्पा कौस्तुभ भागवत या नुकत्याच मुंबई येथील कॉलेज ऑफ फिजिशीयन अॅण्ड सर्जन या मुंबई येथील वाडिया चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये घेण्यात येणाऱ्या बालरोग व नवजात शिशु तज्ञ पदव्युत्तर परीक्षेत उत्तीर्ण झाल्या. त्यांनी एम. बी. बी. एस. चे शिक्षण व्ही. एम. वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे पूर्ण केले. भविष्यात राहुरी येथे सुसज्ज असे बालरुग्णालय सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. राहुरी येथील दंत व्यंगोपचार तज्ञ डॉ. कौस्तुभ भागवत यांच्या त्या पत्नी आहेत. येथील प्रतिथयश वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. मधुसूदन भागवत यांच्या त्या स्नुषा आहेत. दरम्यान, पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.