त्रास देणाऱ्या पतीच्या विरोधात गुन्हा दाखल
शिर्डी शहरातील वर्षा चंद्रकांत पावसे राहणार श्रीरामनगर वय ३५ या महिलेने आपला पती चंद्रकांत नाना पावसे वय ४० हा आपल्याला गेल्या अनेक दिवसापासून शारीरिक मानसिक व दारू पेऊन संशय घेऊन मारहाण करीत असल्याने या त्रासाला कंटाळून आपण माहेरी गेलो होतो घरी आल्यानंतर त्याच विषयावर वाद घालून त्रास देत असल्याने या त्रासाला कंटाळून महिला दक्षता समितीच्या कार्यकर्त्या शोभा वर्पे यांची मदत घेऊन शिर्डी पोलिसात तक्रार दिल्याने शिर्डी पोलिसांनी चंद्रकांत पावसे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे शिर्डी पोलिसांनी चंद्रकांत पावसे याच्या विरोधात ३२३, ५०४, ५०६ या प्रमाणे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस कर्मचारी दिलीप मंडलिक हे करीत आहे