Breaking News

बुलडाणा अर्बन द्वारा आयोजित अपंग शिबिराचा शुभारंभ


बुलडाणा (प्रतिनिधी), 11 - भारतीय साधारण बीमा निगम, भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई व बुलडाणा अर्बनच्या सक्रीय पुढाकाराने बुलडाणा व वाशिम जिल्ह्यातील अपंग गरजू रुग्णांसाठी मोफत जयपुर फुट, कॅलिपर्स आणि कुबड्या वाटप शिबीराचा आज दि. 9 जानेवारी रोजी मोठ्या थाटात शुभारंभ करण्यात आला.
भारतीय साधारण बीमा निगम, भगवान महावीर विकलांग सहायता समिती मुंबई व बुलडाणा अर्बन 
संस्थेच्या वतीने गरजु रुग्णांसाठी 9 ते 14 जानेवारी या कालावधीत सहकार विद्या मंदिर परिसरात मोफत 
जयपूर फुट, कॅलिपर्स आणि कुबड्या वाटप शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आज सकाळी अपंग 
शिबीराचा शुभरंभ करण्यात आला. या प्रसंगी आयोजीत छोटेखानी कार्यक्रमाला बुलडाणा अर्बन परिवाराचे 
संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉ.सुकेश झंवर, भगवान महावीर विकलांग सहायता समितीचे प्रशासकीय अधिकारी नारायणदास व्यास, भारतीय साधारण विमा निगमच्या श्रीमती मेघा परुळेकर, श्रीमती श्रध्दा पाटील व्यास, बुलडाणघा अर्बनचे उपाध्यक्ष राजेश देशलहरा, संचालक डॉ.किशोर केला उपस्थित होते. 
याप्रसंगी मनोगत व्यक्त करतांना राधेश्याम चांडक म्हणाले की, बुलडाणा अर्बन संस्थेने आपल्या सामाजीक उपक्रमाअंतर्गत यापुर्वी 2007 मध्ये अपंग शिबीराचे अयोजन केले होते. या शिबीरात असंख्य गरजु रुग्णांनी लाभ घेतला होता. संस्थेने पुन्हा एकदा आपल्या सक्रीय पुढाकाराने चार दिवशीय अपंग शिबीराचे 
आयोजन केले आहे. सदर शिबीरात वेगवेगळ्या दिवशी रुग्णांची तपासणी हावून त्यांना आवश्यकतेनुसार अपंग साहित्याचे वाटप केल्या जाणार आहे. शिबरार्थ्यांसाठी भोजनाची आणि वाहनाची व्यवस्था करण्यात आली असून जास्तीत जास्त गरजुंनी शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त केले. सदर शिबीर दि. 14 जानेवारी पर्यंत सुरु राहणार असून शिबीरासाठी बुलडाणा व वाशिम 
जिल्ह्यातील जवळपास पाचशेवर रुग्णांनी नांव नोंदणी केली आहे.