Breaking News

शहराची हद्दवाढ संदर्भात तहसील कार्यालय येथे आढावा बैठक


शहराची हद्दवाढ संदर्भात तहसील कार्यालय येथे आढावा बैठक पार पडली. कोपरगांव शहराच्या हद्दवाढी त येणारा कोपरगांव ग्रामीण परिसर....१) दुल्हनबाई वस्ती २) कर्मवीरनगर ३)गोकुळनगरी ४)सह्याद्रीनगर ५) शंकर नगर ६) कोपरगांव शिवरस्ता ( पुर्व बाजु ) ७) ओमनगर ८) द्वारकानगरी ९) गवारेनगर १०) वडांगळे वस्ती ११) सपकळ,पाटणकर,साबळे वस्ती १२) धोंडीबानगर इत्यादी परिसर समाविष्ट होणार आहेत. 

यावेळी हद्दवाढीत समाविष्ठ होणाऱ्या नागरिकांनी कोपरगांव लोकप्रिय आमदार सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचा सत्कार करुन आभार मानले याप्रसंगी तहसीलदार श्री किशोर कदम नगरपालीकेच्या मुख्याधिकारी श्रीमती शिल्पाताई दरेकर,उपनगराध्यक्ष श्री विजयराव वाजे,श्री संजयराव सातभाई, श्री पराग संधान श्री शरदनाना थोरात, श्री कैलास खैरे सर्व आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.