Breaking News

गावठी कट्ट्याचे कनेक्शन मध्यप्रदेशमधून


गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने ठोस पावले उचलली आहेत. त्याच वेळेला त्यांनी शेजारील राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा विषय गंभीर होत त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले जातात असे वक्तव्य केले होते. ते अतिशय तंतोतंत ठरले असून जामखेड येथील दुहेरी हत्याकांडामध्ये गोविंद याने दोन गावठी कट्टे हे मध्यप्रेदशात जावून आणली असुन ती पोलिसांनी जप्तही केली आहेत.