उत्तर भारतात वादळी पावसाचे 104 बळी वादळाचा वेग ताशी 120 किमी
राजस्थानमध्ये आलेल्या वादळाने 2 तासात प्रामुख्याने 4 जिल्ह्यांमध्ये विध्वंसक रूप धारण केले आहे. या वादळाचा वेग साधारणतः 120 किमी एवढा असल्याचे सांगितले जाते. वादळाचा सर्वात जास्त प्रभाव भरतपूर, घौलपूर, अलवर आणि झुंझुनूंमध्ये पहायला मिळाला. या 4 जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वित्त व जिवीतहानी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 34 लोकांचा मृत्यू झाला, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. सोबतच अनेक घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे लोकांच्या मनात मोठी भीती निर्माण झाली. सायंकाळी 6 ते साडे 7 वाजताच्यादरम्यान आलेल्या या वादळाने नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम केला आहे. वादळादरम्यान दृष्यमानता 500 मीटरपेक्षाही कमी झाली होती. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती. झाडे पडल्याने काही ठिकाणी रस्ते बंद झाल्याचेही प्रकार घडले. तसेच वीजेचे खांब पडल्याने व तारा तुटल्याने वीज देखील खंडित झाली आहे. त्यामुळे अनेक ठिक ाणी शाळांनी सुट्टी घोषित करण्यात आली आहे.
वादळाने वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली होती. लोक रस्त्यातच अडकली होती. त्यामुळे तासांतास लोकांना रस्त्यावर घालवावे लागले. रस्त्यावर अडकलेले लोक वादळ शांत होण्याची व घरी परतण्याची इच्छा व्यक्त करत होते. दुसरीकडे राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी अधिकार्यांना वादळ व पाऊस प्रभावित भागात आवश्यक सुविधा तत्काळ पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच ज्या लोकांची जीवित व वित्तहानी झाली आहे, त्यांना मदत करण्याबाबत जिल्हाधिकार्यांसह वरिष्ठ अधिकार्यांना सांगण्यात आले आहे. या वादळी पावसाने तापमानात मात्र कमालीची घट झाली आहे. त्यामुळे लोकांची उष्णतेपासून काहीशी सुटका झाली आहे.