Breaking News

नक्षल्यांची माहिती द्या, लखपती व्हा !


गडचिरोली : राज्य सरकारने नक्षलवाद्यांवर लक्षावधी रुपयांची बक्षीसे जाहीर केली आहेत. नक्षल्यांची माहिती देणा-यांना 16 ते 60 लाख रुपयांपर्यंतची बक्षीसं दिली जाणार आहेत. गेल्या ात गडचिरोली पोलिसांनी 40 माओवाद्यांना कंठस्नान घालत मोठं यश प्राप्त केलं. जनतेत माओवाद्यांची दहशत कमी करण्यासाठी गडचिरोली पोलिसांनी स्थानिक वृत्तपत्रात 16 लाख ते 60 लाखांपर्यंत बक्षीस असलेल्या माओवाद्यांची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहे. यामध्ये जोगन्ना उर्फ चिमाला नर्सय्या, पहाडसिंह उर्फ बाबुराव तोफा बक्षीस प्रत्येकी 16 लाख रुपये, मल्लोजुल्ला वेणूगोपाल, दीपक उर्फ सह्याद्री तेलतुंबडे, नर्मदाअक्का प्रत्येकी 60 लाख रुपयांच बक्षीस या माओवाद्यांवर आहे.