शिवप्रतिष्ठाण ही संघाची उपसंघटना
संभाजी भिडे यांची शिवप्रतिष्ठाण ही आरएसएसची उपसंघटना असल्याचे सांगत हे मनुवादी विचारसरणीचे आहेत. त्यामुळे जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून तरुणांची माथी भडकवण्याचे काम संभाजी भिडे करत असल्याचा आरोप यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला. त्याचसोबत मिलिंद एकबोटेला सुप्रीम कोर्टाने जामीन नाकारला तरी त्याला अटक करायला पोलीस टाळाटाळ करीत होते आणि मुख्य आरोपी मनोहर भिडे आजही मोकाट फिरत आहेत. एवढे होऊनही मुख्यमंत्री त्याला निर्दोष असल्याचे सिद्ध करत आहेत असा आरोपही संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आला आहे.