इंडिगोच्या विमानाचे आपतकालीन लँडिंग
नवी दिल्ली - दुबईमधील इंडिगो विमानामध्ये धुराची चेतावणी देणारा अलार्म वाजल्याने या विमानाला अचानक मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर लँडिंग करायला लागल्याची घटना घडली. या विमानात एकूण 184 प्रवाशांसह 6 कर्मचारी प्रवास करत होते. मुंबईहून दुबईला जाणार्या 6 ई 61 इंडिगो विमानाला धूर निघाल्याचा अलार्म वाजल्याने प्रवासात मध्येच माघारी फिरावे लागले. मात्र नंतर हेदेखील उघड झाले, की संबंधित चेतावणी देणारा अलार्म हा चुकीचा होता. विमानात कोठेही धुर आढळला नाही. विमानाचे लँडिंग सुर क्षितपणे झाले असून सर्व प्रवासी सुखरुप आहेत, अशी माहिती विमान कंपनीकडून देण्यात आली आहे.