पुणे, दि. 06, मे - दारिद्य्ररेषेखालील कुटुंब वडील - लेबर वर्कर, दोन मुले शुभम आणि शिवम, आई गृहिणी. शुभम बी.कॉमच्या दुसर्या वर्षाला शिकत आहे. शुभमच्या दोन किडनीपैकी एक कि डनी एक्टोपिक होती तर दुसरी काम करीत होती आणि तीही विकाराने बाधित झाली. एन्ड स्टेज रिनल डिसीजचे निदान झाल्यानंतर शुभमने चार वेळा नांदेडला डायलिसिस केले होते. मालबोरगाव तालुका .किनवट जिल्हा. नांदेड येथील शुभम राजेश पुरी, वय-22 वर्षे यास आई श्रीमती एकता राजेश पुरी , वय-40 गृहिणी यांनी मुलास किडनी देऊन जीवनदान दिले . शुभम राजेश पुरी या रुग्णास 7 वर्षांपासून किडनी विकाराचा त्रास होत होता . किनवट महाआरोग्य शिबिरात शुभम राजेश पुरी याच्या किडनी विकाराचे निदान झाले होते. सदर शिबिरातील डॉक्टर नी त्यास किडनी प्रत्यारोपणाचा सल्ला दिला होता परंतु प्रतिकूल आर्थिक परिस्थितीमुळे त्याला किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. खाजगी रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणाचा खर्च गरीब रुग्णाच्या आवाक्याबाहेर आहे. परंतु ससून सर्वोपचार रुग्णालय हे गोरगरिबांचे आशा स्थान आहे. ससून मध्ये 3 मे रोजी किडनी प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांच्या प्रोत्साहन व मार्गदर्शनामुळे ससून टीम ने यशस्वी केलेली हि शस्त्रक्रिया शुभम राजेश पुरी साठी जीवनदायी ठरली . हे किडनी प्रत्यारोपण 5 वे तसेच जिवंत किडनीदानात ससून मध्ये दुसरे होते. अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले असे म्हणाले की किनवटहुन एवढ्या दूर अंतरावरन पुण्याला ससून रुग्णालयात किडनी प्रत्यारोपणासाठी विश्वासाने आला. ससून रुग्णालयाचा प्रवास सेवाभावी टीम व अत्याधुनिकतेमुळे प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी होण्यापर्यंत झाला आहे. सर्वसुविधांनी युक्त ससून गोरगरीब तसेच मध्यमवर्गीय रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
आईने दिले मुलाला जीवनदान, किडनी प्रत्यारोपण यशस्वी
Reviewed by Dainik Lokmanthan
on
10:45
Rating: 5