Breaking News

सुनील शितपचा जामिनासाठी अर्ज

घाटकोपरमधील सिद्धी साई इमारत दुर्घटनेतील मुख्य आरोपी सुनील शितपने तात्पुरत्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आपल्या आईची तब्येत सध्या फारच खालावली असल्याने तिची सेवा करण्यासाठी आपल्याला काही दिवसांचा जामीन देण्यात यावा, अशी विनंती शितपने हायकोर्टाला केली आहे.