पुजारीची एसएमएसद्वारे खंडणीची मागणी
नेत्यांनी, उद्योगपतींनी शिव्या घालून इज्जत काढल्याने 'चिंदी चोर' डॉन सुरेश पुजारीची दहशत संपत चालली आहे. यामुळे व्यापाऱ्यांनी देखील बाहेर देशातून येणारे अज्ञात नंबरचे फोन उचलणे बंद केले आहे. यामुळे अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीने एसएमएसद्वारे खंडणी मागण्याचा नवा फंडा सुरू केला आहे.शुक्रवारी रात्री उल्हासनगरातील व्यापारी मनीष बठीजा या ३० वर्षीय व्यापाऱ्याला सुरेश पुजारी याने फोन केला. परंतु बठीजा यांनी फोनला प्रतिसाद दिला नसल्याने पुजारी याने एसएमएस करून बठीजा यांच्याकडे १० लाख रुपयांची खंडणी मागितली