Breaking News

शेतकरी पुन्हा जाणार दहा दिवसांच्या संपावर!


राहुरी विशेष प्रतिनिधी  येत्या १ ते १० जून या काळात राज्यातील शेतकरी पुन्हा संपावर जाणार आहे. या संपात किसान क्रांती, महाराष्ट्र राष्ट्रीय किसान महासंघ आणि किसान एकता मंचसह देशातील १०० हून अधिक शेतकऱ्यांच्या संघटना सहभागी होणार आहेत, अशी माहिती किसान क्रांती संघटनेच्या अँड. कमल सावंत यांनी दिली.

अँड. कमल सावंत यांनी सांगितले, महाराष्ट्रातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी मागील वर्षी याच कालावधीत संपावर गेला होता. त्याची सुरुवात नगर जिल्ह्यातील पुणतांबा येथून झाली होती. किसान क्रांती संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनाची ठिणगी याच जिल्ह्यात पडली. नंतर ती संपूर्ण महाराष्ट्रात पसरली.

शांततेच्या मार्गाने व गनिमी काव्याने हा संप करताना कोणताही शेतमाल रस्त्यात न टाकता अहिंसक मार्गाने संप करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे किसान क्रांती संघटनेच्यावतीने सांगण्यात येत आहे.