Breaking News

वन्यप्रेेमींची पाणी सोडण्याची मागणी

उन्हाची तीव्रता दिवसेदिवस वाढत असताना पशु-पक्ष्यांंची काय अवस्था होत असेल, याचा रेहकुरी वन्यजीव विभागाचे वनक्षेत्रपाल येळे यांना विसर पडललेला आहे. येळे यांनी आपण ज्या प्राण्यांच्या जिवावर आपण पगार घेतो. त्यामुळे आपला प्रपंच चालतो हे लक्षात घेवुन तरी काम करावे अशी अपेक्षा रामदास सुर्यवंशी यांनी व्यक्त केली असुन, त्वरीत पाणवठयात पाणी सोडावे अशी मागणी देखील सुर्यवंशी यांनी केली आहे.


संपूर्ण भारतात काळवीटांसाठी प्रसिद्ध असणारे अभयारण्य म्हणजे, रेहकुरीचे काळवीट अभयारण्य. या अभयारण्यामध्ये मात्र काळवीटांसाठी पाणवठ्यांमध्ये पाणीच नसल्याचे दिसून येत आहे. आज आपणास काही वेळ पाणी न मिळाल्यास नकोसे वाटते आणि या निष्पाप प्राण्यांना जर पिण्यासाठी पाणीच जर मिळत नसेल तर मग हे प्राणी अभयारण्य सोडून जाण्यास वेळ लागणार नाही. कर्जत तालुक्यातील रेहकुरी वन विभागाच्या जंगलातील पाणवठे कोरडेठाक पडल्याने प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत असल्याने या वन्यप्राण्यांच्या शिकारीमध्येही वाढ झाली आहे. याकडेही येळे यांनी लक्ष द्यावे अशी वन्यप्रेमींची अपेक्षा आहे.