Breaking News

नारायणगव्हाणमधील चुंभळेश्‍वर परिसरात प्रेरणादायी वृक्षसंवर्धन अभियान


नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथील प्रख्यात चुंभळेश्‍वर डोंगर परिसरात विविध पशु-पक्षी, औषधी वनस्पती व उंच निसर्गरम्य डोंगरावर आगीमुळे अनेक वृक्ष जळुन खाक झाले होते. त्यामुळे गावातील चुंभळेश्‍वर वृक्षारोपन व वृक्षसंवर्धन समितीने याठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्षारोपन केले.
1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत शिरूर येथील नटराज कोहीनुर अकॅडमी ऑफ फिल्म इन्स्टिट्युटच्या 7 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत येत्या दिवाळीमध्ये संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार्‍या शु (माणुस नावाच भुत) चित्रपटातील कलाकार व चुंभळेश्‍वर वृक्षसंवर्धन समितीचे शरद पवळे, लेखक, निर्माता, दिग्दर्शक भाऊसाहेब इरोळे, अश्‍विनी इरोळे, अमोल माने, भरत घावटे, विनायक साळवे, अक्षय भाकरे, श्रीकांत निचीत, अमृत झांबरे, राहुल चंद्रे, सार्थक जाधव, फसहन शेख या सर्वांनी चला शिवार तापलया रान सार पेटलया या स्लोगनचा प्रचार-प्रसार करुन सकाळी 8 ते सायं.6 वा. पर्यंत चुंभळेश्‍वराच्या डोंगरावरील झाडांना आळी करणे, झाडांना माती टाकणे, झाडांना काठ्या लावणे, आळ्यांना पाणी देवुन झाडाभोवती पाण्याचे डबे भरुन ठेवण्याचे काम दिवसभर केले. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते शरद पवळे, सुदाम नवले, संकेत शेळके यांनी सर्व टिमचा सत्कार केला.
यावेळी पवळे म्हणाले की, तुम्ही निसर्गाचे रक्षण करा, निसर्ग तुमचे रक्षण करेल, निसर्गाचा समतोल राखण्यात झाडांचे मोठे योगदान आहे. सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून तालुक्यात लाखो झाडांची लावगड झाली, मात्र प्रत्यक्षात किती झाडे जगली, वृक्षारोपन झाल्यानंतर त्याचे संगोपण होणे गरजेचे असून यामध्ये तरुण पिढीने लक्ष देणे गरजेचे आहे. चुंभळेश्‍वर मंदीर परिसरात देखिल मोठ्या प्रमाणात वृक्षलावगड केली. परिसर हिरवाईने नटला आहे. मंगळवारी येथिल झाडांना आळे करून पाणी सोडण्यात आले, अशा प्रकारे वृक्षारोपणाबरोबर वृक्षसंवर्धनाची जबादारी स्वीकारत उत्साहात हा वृक्षसंवर्धनाचा प्रेरणादायी कार्यक्रम पार पडला.