चोरट्यांना पकडकण्यात पोलिसांना यश
कोल्हार भगवतीपूर येथे आज {दि. ११} सकाळी सहाच्या दरम्यानतीन चोरट्यांना पकडण्यात पोलिसांना यश आले. भगवतीपूर देवालय ट्रस्टच्या मालकीच्या उसात हे चोरटे लपून बसले होते. तब्बल तीन तासांच्या अथक प्रयतानानंतर या चोरट्यांना पकडण्यात आले. सागर दिलीप थोरात { रा. पुणतांबा ता. कोपरगाव}, अमोल लक्ष्मण पारे { रा. येवला ता. कोपरगाव} आणि महेश भाऊसाहेब मंचेरे {रा. गोटुंबे आखाडा ता. राहुरी} असे या चोरट्यांनी नावे आहेत. यातील ३ जण फरार आहेत.
पोलिसांनी या चोरट्यांकडून १ लाख ९०५ रोख रक्कम, पल्सर दुचाकी, लोखंडी कट्टा, फायटर चाकू, नोकिया, सॅमसंग मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला. हे चोरटे नगर-मनमाडरोड वरील वाहने लुटून कोल्हारच्या दिशेने जात होते. बाभळेश्वरहून रात्रीची गस्त करत असताना पोलिसांना फोन आला, चोरटे कोल्हारच्या दिशेने पल्सर दुचाकीवरून गेले आहेत. त्यानुसार स. पो . नि. भालचंद्र शिंदे, रणजित गलांडे आदींनी या चोरट्यांचा पाठलाग
केला. यात तिघांना पकडण्यात आले तर बाकी ३ जण फरार झाले.