Breaking News

अरणगावात बहिरेपणा तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

नगर तालुक्यातील अरणगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एशियन नोबल हॉस्पिटल आणि अवतार मेहेरबाबा पी.पी.सी. ट्रस्ट व राजमुद्रा युवा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बहिरेपणा तपासणी शिबिराला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळला असून अरणगाव व परिसरातील 104 रुग्णांची तपासणी केली असल्याचे सरपंच स्वाती गहिले यांनी सांगितले.

यावेळी शिबिरात रुग्णांना 44 श्रवणयंत्राचे मोफत वाटप करण्यात आले. हे शिबीर रविवारी मेहरबाबा हेल्थ सेंटर येथे झाले.यावेळी सरपंच स्वाती गहिले म्हणाल्या की, यापुढील काळात गोर-गरिब घटकांतील नागरिकांसाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. तरी गरजुंनी शिबिरांचा लाभ घ्यावा. तसेच थोड्याच दिवसात रेशन कार्ड मध्ये नाव नोंदनी करण्यासाठी शिबीर आयोजित करण्यात येणार आहे. गावच्या विकासासाठी शासनाच्या विविध योजना गावात राबविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शिबीर यशस्वीतेसाठी माजी सरपंच सुजित कोके, सरपंच स्वाती गहिले, मेहरबाबा ट्रस्टचे अध्यक्ष रमेश जंगले, किशोर कांबळे, सामाजिक कार्यकर्ते लहु आजबे, अरविंद जगताप, सुजाता कांबळे, अनिल भिंगारदिवे, बबन शिंदे, पोपट शिंदे, बंडू गहिले, प्रशांत गहिले, बाबा कल्हापुरे, किशोर शिंदे, राजू शेळके, संजय खंडागळे, बापू कल्हापुरे, नवनाथ गहिले, रोहिदास शिंदे, अमोल दळवी, बाळु शिंदे, अर्जुन शेळके, नंदु गहिले, रावसाहेब अनाट यांसह राजमुद्रा युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.