Breaking News

महिलेचे तहसिल कार्यालयासमोर आपल्या मेंढ्यांसह उपोषण

तालुक्यातील कोरेगांव येथील सि.स.च्या नकाशाप्रमाणे व नेहमीचा वापर असलेल्या रस्त्यावरील अतिक्रमण काढावेत या मागणीसाठी सखुबाई धोंडीराम दोलताडे या तहसिलदार कार्यालयासमोर मेंढयासह उपोषणास बसल्या आहेत.

दोलताडे यांनी तहसिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी माझ्या कुटूंबासह कोरेगांव येथे सि.स.नं.42 मध्ये माझे कायमचे वास्तव्य आहे. मी धनगर समाजाची असल्याने माझ्याकडे मेंढया आहेत. या मेंढया रोज शेतात चरण्यासाठी ने आण करावी लागते. तसेच मला शौचालय नसल्याने मला शैाचालय बांधकाम करायचे आहे, मात्र रस्त्यावर अतिक्रमण असल्याने मला बांधकाम करता येत नाही.
माझ्या घराकडे जाण्याचा पुर्वीपासुन वहीवाटीचा रस्ता आहे. परंतू याच रस्त्यावर अतिक्रमण केल्याने आमची मोठी कुचंबणा झाली आहे, तरी हे अतिक्रमण तात्काळ काढून टाकावे या मागणीसाठी दोलताडे या आपल्या मेंढयांसह उपोषणास बसले आहेत.
दोलताडे यांनी दिलेल्या निवेदनामध्ये सरपंच, सदस्य व ग्रामविकास अधिकारी यांनी रस्त्याचा चुकीचा पंचनामा करून मला न्यायापासुन वंचीत ठेवत आहेत. वास्तविक ग्रामपंचायत, पंचायत समितीकडून जाणीवपुर्वक दिशाभूल होत असुन माझ्यावर अन्याय होत आहे.