Breaking News

पुणेवाडी येथे विद्यापीठस्तरीय जलसंधारण शिबीराचे उद्घाटन

सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठ, पाणी फाऊंडेंशन, न्यू आर्टस् कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स कॉलेज पारनेर राष्ट्रीय सेवा योजना व विदयार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने पुणेवाडी येथे विद्यापीठस्तरीय जलसंधारण शिबीराचे आयोजन दि. 5 ते 11 मे दरम्यान करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे यांचेहस्ते करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, प्राचार्य डॉ. रंगऩाथ आहेर, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, डॉ. सुधीर वाघ, चेअरमन बाबासाहेब रेपाळे, सरपंच बाळासाहेब रेपाळे, जयवंत पुजारी, प्रा. संजय कोल्हे, प्रा. ज्योत्स्ना म्हस्के, प्रा. गणेश रेपाळे, प्रा. संजय आहेर आदी मान्यवर उपस्थित होते. 

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना पारनेर पंचायत समिती सदस्य डॉ. श्रीकांत पठारे म्हणाले की, राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होते. या दृष्टीने आजचे शिबीर महत्त्वाचे आहे. 
प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले की, पाणी फाऊंडेशन सध्या ज्या जोमाने व्यापक पातळीवर कार्य करत आहे, त्याच कार्याला रासेयोची जोड मिळण्याची संधी या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध झाली आहे. अधिक चांगले काम अशा शिबिरांतून होईल ही समाजासाठी मोलाची अशी भरीव कामगिरी असणार आहे.
याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रासेयो व विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई म्हणाले की, रासेयोच्या माध्यामातून गावपातळीवर मूलभूत असे काम होण्यासाठीच आपण ही शिबीरे आयोजित करण्याचे ठरविले आहे. या निमित्ताने गावच्या इतिहास लेखनाचे सुध्दा अतिशय मोलाचे असे काम होणार आहे. कार्यक्रमाचे आभार प्रा. प्रियंका मिसाळ यांनी मानले.