डेब्रीज टेंडर कार्यकारी अभियंता हांडेंच्या कृत्याची सजा देयक कार्यकारी अभियंता वाळकेंना!
मुंबई/विशेष प्रतिनिधी ।09: महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या मंत्रालय इमारतीत डेब्रीजच्या नावावर दिवसा 34 लाखांचा दरोडा टाकणारे डेब्रीज टेंडर कार्यकारी अभियंता रणजीत हांडे प्रमोशनचे फायदे लाटत आहेत तर देयके अदा करणार्या कार्यकारी अभियंता प्रज्ञाताई वाळके निलंबनाची सजा भोगत आहेत. रणजीत हांडे चंद्रकांत दादा पाटील यांची बदनामी करण्यासाठी श्रीनिवास जाधव यांच्या खांद्याचा वापर करून वावड्या पिकवत आहेत तर अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी भ्रष्ट अभियंता बचाव मोहीमेचा पिंड कायम ठेवुन डेब्रीज घोटाळ्याचा खोटा खुलासा करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेले हे नाटक महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला कुठे घेऊन जाणार? असा सवाल विचारला जात आहे.
देशाच्या इतिहासात एखादया राज्याच्या मंत्रालय इमारतीत 897 ट्रक डेब्रिज केवळ एका वर्षात काढण्याचा विक्रम सन 2015-16 या आर्थिक वर्षात शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यरत असलेल्या तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी करून दाखविला आहे. या काळात घडलेल्या या डेब्रीज घोटाळ्याचा ठपका ठेवून 24 नोव्हेंबर 2015 रोजी शहर इलाखा साबां विभागाच्या कार्यकारी अभियंता पदाचा कार्यभार घेतलेल्या प्रज्ञाताई वाळके यांना निलंबीत केले. मात्र तत्पूर्वी दि. 23 मार्च 2015 ते 24 नोव्हेबर 2015 या काळात कार्यकारी अभियंता म्हणून कार्यरत असलेले रणजीत हांडे यांनी डेब्रीजचे टेंडर प्रस्तावित केले, कार्यारंभ आदेश काढले त्यांना या घोटाळ्यातून सोयीस्करपणे बाजूला ठेवले गेल्याचा आरोप होऊ लागला आहे, डेब्रीज टेंडर कार्यकारी अभियंता रणजीत हांडे यांच्या कृष्णकृत्याची सजा प्रज्ञाताई वाळके यांना दिली गेली आहे. हांडे यांनी टेंडर केले म्हणून वाळके यांनी देयके अदा केली असा एक प्रवाद साबांत आहे.
रणजीत हांडे यांना बायपास करून हे सर्व प्रकरण प्रज्ञाताई वाळके यांच्या नावावर खपविण्यात मुंबई साबांचे अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांचे योगदान मोठे असल्याची चर्चा साबांत आहे. अरविंद सुर्यवंशी यांनी अगदी सुरूवातीपासून या घोटाळ्याचे धागेदोरे रणजीत हांडे यांच्यापर्यंत पोहचू नयेत म्हणून दोन सह अभियंत्यांना अडकविण्याचा प्रयत्न करून कार्यकारी अभियंत्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र ओरड होऊ लागल्यानंतर प्रज्ञाताई वाळके यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. प्रज्ञाताई वाळके यांना निलंबीत व्हावे लागल्यानंतर या घोटाळ्याचे पाळेमुळे 23 मार्च 2015 पर्यंत मागे रूतल्याचा खुलासा होऊ लागला आणि या घोटाळ्याचे सुत्रधार तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे असल्याचा खुलासा साबांतून होऊ लागला आहे.
या डेब्रीज घोटाळ्याची तीव्रता पुन्हा व्हायरल होऊ लागल्यानंतर मुंबई आणि नाशिक साबां अधिक्षक अभियंता कार्यालयात भुंकपाचे हादरे बसू लागले. दोन्ही अधिक्षक अ भियंत्यांची भेट झाल्यानंतर तातडीने डेब्रीज घोटाळ्याशी संबधीत खुलाशाची टिपणी जारी करण्यात आली. हा खुलासा घोटाळ्याच्या आगीतून बाहेर पडण्यासाठी केला असला तरी आगीतून बाहेर पडण्याऐवजी आणखी गुरफटण्यास कारणीभूत ठरला आहे. नऊशे नाही तर 600-650 ट्रक्स डेब्रीज काढल्याचा हा खुलासाही बनवेगीरी मानली जात आहे.
मंत्रालय इमारत न पाडता अथवा मंत्रालय आवारात कुठलेही नवीन खोदकाम न करता एवढ्या मोठ्या प्रमाणात डेब्रिज आले कुठून? याचा हिशेब देण्याची कुवत या खुलाशात नाही. या एकूण परिस्थितीवरून तत्कालीन कार्यकारी अभियंता रणजीत हांडे आणि अधिक्षक अभियंता अरविंद सुर्यवंशी यांनी दोघांनी संगनमताने राज्याचा कारभार चालवणार्या इमारतीवर दरोडा टाकण्याचे धाडस दाखवले असा अर्थ काढला जात आहे.
हा दरोडा उघड होऊ नये म्हणून उभय अभियंत्यांनी साबां मंत्रालय आणि प्रशासनाचे लक्ष वेगळ्या मुद्याकडे वेधले. बांधकाम मंत्र्यांची बदनामी करण्यासाठी त्यांचे खासगी सचिव श्रीनिवास जाधव यांच्या नावाचा खुबीने वापर केला जात आहे.(क्रमशः)
हांडेंविरूध्द मुख्यमंत्र्यांकडे सात
तर एसीबीकडेही तक्रारींचा पाऊस
नाशिक सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता रणजीत हांडे यांच्या कार्यपध्दतीविषयी आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यमंत्र्याकडे सात तक्रारी केल्या आहेत. मंत्रालय डेब्रीज घोटाळ्याची चौकशीही मुंबई साबां दक्षता पथकाचे अधिक्षक अभियंता धनंजय चामलवार करीत आहेत. याशिवाय लाच प्रतिबंधक विभाग मुंबई यांनाही रणजीत हांडे यांच्या विषयी अनेक तक्रारी प्राप्त आहेत. याविषयी विशेष वृत्तांत उद्याच्या अंकात...
शाखा अभियंता मंडगेंचा कार्यकाल संशयास्पद
दि. 23/3/2015 ते 24/11/2015 या कालावधीत शहर इलाखा विभागात कार्यकारी अभियंता असलेले रणजीत हांडे यांनी मलबार शाखेसाठी मंडगे नामक शाखा अभियंत्यांची खास नियुक्ती केली. मंडगे यांनी या काळात 2 कोटीहुन अधिक बीले काढल्याची चर्चा असून हांडे यांच्या बदलीनंतर त्यांचीही बदली होण्याचा योगायोग जुळून आल्याने मंडगे यांचाही कार्यकाल संशयास्पद मानला जात आहे. यावर अधिक प्रकाशझोत उद्याच्या अंकात...
हांडे साहेब! हा हिशेब देणार का..?
शहर इलाखा सार्वजनिक बांधकाम विभागात दि. 23 मार्च ते 24 नोव्हेबर 2015 या काळात कार्यकारी अभियंता म्हणून रणजीत हांडे कार्यरत होते. या काळात म्हणजे 3/8 ते 19 /11/2015 या काळात निघालेल्या टेडरवर कुणाची स्वाक्षरी आहे? कार्यारंभ आदेश कुणाच्या स्वाक्षरीने निघाले? 17 ऑगस्ट रोजी एकाच दिवशी तब्बल 830 मजुर मंत्रालयात कुणी आणले? कसे आणले? कुठे मिळाले हे मजूर? या मजूरांना जेवणाचे डबे कुणी कुठून पुरविले? डेब्रीज काढण्यासाठी आणलेल्या या मजुरांनी वापरलेले 250 टोपले, 250फावडे, 250 कुदळी, 250 टिकाव कुठून आणले? ही मालमत्ता मजुरीची ठेकेदाराची की शासनाची? शासनाची असेल तर सध्या ही मालमत्ता कुठे आहे? यासंदर्भात आ. चरणभाऊ वाघमारे यांनी मुख्यंमत्र्यांकडे तक्रार केली आहे. रणजीत हांडे हा हिशेब कसा देणार? हा साबांत औत्सुक्याचा विषय ठरला आहे.