Breaking News

सोळा वर्षाचे पाप दाबण्यासाठी लोखंडेंची बदनामी करण्याचे दत्तु गितेंचे षडयंत्र

ठाणे जिल्हा परिषदेच्या भिवंडी बांधकाम उपविभागात शाखा अभियंता म्हणुन कार्यरत असलेल्या दत्तू गिते यांनी सोळा वर्षात करोडोंचा भ्रष्टाचार केल्याचे आरोप झाल्याने नव्याने रूजू होणारे उपअभियंता राजेंद्र लोखंडे यांच्यासमोर चौकशीचे आव्हान उभे राहणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, दत्तु गिते आणि त्यांच्या बगलबच्यांनी उपअभियंता लोखंडेंनी पदभार स्वीकारण्याआधीच त्यांच्या बदनामीचे अस्र उपसल्याचे समजते.
तब्बल सोळा वर्ष भिवंडी उपविभागात शाखा अभियंता म्हणून दीर्घ अनुभव असलेले दत्तु गीते पक्के रट (कोडगे) झाले असल्याने कुणीही नवीन अभियंता रूजू होण्याचे संकेत मिळाले की त्यांनी पदभार घेण्याआधी त्यांना हाकलून लावण्याचे षडयंत्र राबविण्यात दत्तू गिते चांगलेच तरबेज आहेत. नवीन अभियंता रूजू झाला तर आजवर केलेल्या भ्रष्टाचाराचे पाप उघड होईल म्हणून नवीन अभियंत्यांला स्थीर स्थावर होऊ द्यायचे नाही, असा गिते आणि कंपनीचा कार्यक्रम राजेंद्र लोखंडे यांच्या संदर्भातही सुरू झाला आहे.
15 मेच्या दरम्यान भिवंडी बांधकाम उपविभागात उपअभियंता म्हणून राजेंद्र लोखंडे पदभार स्वीकारणार आहेत. लोखंडे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर दत्तु गिते यांना आपल्या सोळा वर्षातील पापाचा हिशेब द्यावा लागणार आहे. ही आफत टाळण्यासाठी दत्तु गिते गोटातून लोखंडे याना बदनाम करण्याचे षडयंत्र राबविण्याची प्रक्रीया सुरू झाली आहे. राजेंद्र लोखंडे यांना भिवंडी येथे नियुक्ती होण्यापुर्वी काळ बदली आदेशाची प्रतिक्षा करावी लागली होती.त्या कारणांचे खोदकाम दत्तु गिते यांनी सुरू केल्याचे सुत्रांकडून समजते.