निधी जगतापला पुरस्कार प्रदान
नगर । प्रतिनिधी - येथील आर्मी स्कूलची इयत्ता दहावीची विद्यार्थिनी निधी राकेश जगताप हिला 2018 चा ‘मिस फेस ऑफ द इअर इंडिया’ पुरस्कार मिळाला. पुणे येथील कोरेगांव पार्क येथे आयोजित गेलस् इव्हेन्टस् अॅण्ड इंटरटेन्मेंट प्रेझेन्ट स्पर्धेत तिने भाग घेतला होता. यामध्ये निधीला मिस बॉडी ब्युटीफूल 2018 पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मिसेस युनिव्हर्स अरब, एशिया मिसेस खुशबु करवा आणि बॉलीवूड डिझायनर मझर रिझवी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.