Breaking News

बहुमतासाठी फोडाफोडीचे राजकारण

जनता दल-काँग्रेस-बसपा या धर्मनिरपेक्ष युतीने 115 संख्याबळासह सत्तास्थापनेचा दावा केला आहे. तरी राज्यपाल सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपलाच सत्तास्थापनेसाठी करण्यात आल्यामुळे गुरूवारी काँगे्रस आ णि जेडीएस आक्रमक पावित्रा घेण्याची शक्यता आहे. 104 वर अडलेल्या भाजपाला 221 सदस्यांच्या विधानसभेत आवश्यक संख्याबळ मिळवण्यासाठी काही आमदार मिळवावे लागतील. भाजप दोन छोटे पक्ष, एक अपक्ष यांना आपल्याकडे वळवण्यास प्राधान्य देऊ शकेल. त्यामुळे भाजपा 107 वर पोहचणार असला तरी त्यामुळे बहुमताचा 111 आकडा गाठता येणार नाही, तसेच त्या संख्याबळात काँग्रेस-जनता दल युतीवर मातही करता येणार नाही. त्यासाठी त्यांना किमान दहा काँग्रेस- जनतादल आमदारांना फोडावे लागेल. किमान विश्‍वासमताच्यावेळी त्यांना अनुपस्थित ठेवावे लागले. त्या परिस्थितीत सभागृहाचे संख्याबळ 221 हून 211 वर येईल आणि बहुमताचा आकडाही घसरुन 106 वर येईल. त्यावेळी बहुमत सिद्ध करणे भाजपाला शक्य होईल.