Breaking News

जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटींची ऑफर : कुमारस्वामी

मला दोन्ही बाजूची ऑफर आहे. 2004 आणि 2005 मध्ये मी भाजपसोबत जायचा निर्णय घेतला. पण त्यामुळे माझ्या वडिलांच्या कारकिर्दीवर काळा डाग पडला. देवाने मला तो डाग पुसण्याची संधी दिली आहे. म्हणून मी आता काँग्रेससोबत जाणार आहे, असे कुमारस्वामी यांनी बंगळुरु येथील पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल खंडित स्वरुपाचा आल्याने सरकार स्थापनेसाठी घोडेबाजाराला सुरुवात झाली आहे. भाजपकडून जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटींची ऑफर देऊ केली असल्याचा आरोपही कुमारस्वामी यांनी केला आहे. कुमारस्वामी म्हणाले, की जेडीएसच्या आमदारांना प्रत्येकी 100 कोटींची ऑफर देण्यात आली आहे. हा काळा पैसा कोठून येत आहे? ते स्वतःला गरिबांचे कैवारी समजतात आणि आज ते आमदार फोडण्यासाठी पैशांची ऑफर देत आहेत. यावेळी त्यांनी आता आयकर खाते कोठे आहे? असाही सवाल उपस्थित केला.