Breaking News

श्री संत मुक्ताई पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त मुलींच्या अखंड हरिनाम सप्ताह

श्री संत मुक्ताई पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त अहमदनगर शहरातील जाधव पेट्रोल पंपाशेजारी, जाधव नगर, नगर-कल्याण रोड, नालेगाव येथे मुलींच्या अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या हरिनाम सप्ताहाचा प्रारंभ आजपासून होत आहे. त्याचबरोबर संत मुक्ताई चरित्र कथा संगीतमय सर्व समाजास माहिती व्हावी यासाठी हभप. लक्ष्मीताई खडके महाराज चिचोंडी पाटील( वृंदावन ) या सांगणार आहेत. तसेच सप्ताहामध्ये जलसंवर्धन, वृक्षारोपण, स्त्रीभ्रूणहत्या, आईवडिलांची सेवा, शेतकरी आत्महत्या रोखणे यावर प्रबोधन करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये पहाटे 4 ते 6 वाजेपर्यंत काकडा, सकाळी 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम, सकाळी 9 ते 11 मुक्ताई चरित्र कथा त्यानंतर सायं. 4 ते 5 प्रवचन होणार आहे. सायं. 5 ते 7 हरिपाठ होऊन रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत कीर्तनाचे असे दैनिक कार्यक्रमाचे आयोजन असणार आहे. या सप्ताहाचे प्रथम पुष्प आज औरंगाबाद येथील प्रवचनकार ह.भ.प पल्लवीताई महाराज घोगरे या गुंफणार आहेत, त्याचबरोबर रात्री काष्टी तालुक्यातील रामतिर्थ सालेवडगाव येथील कीर्तनकार हभप. क्रांतीताई महाराज सोनवणे यांचे कीर्तन होणार आहे. दुसर्‍या दिवशी 4 मे रोजी कोपरगाव येथील हभप. साक्षीताई महाराज वाघ यांचे प्रवचन होणार असून नेवासा येथील हभप. पूजाताई महाराज कुटे यांचे कीर्तन होणार आहे. 5 मे रोजी जामखेड येथील हभप. भाग्यश्रीताई अंबारे यांचे प्रवचन होणार असून, सोलापूर येथील हभप. सपनाताई महाराज साखरे यांचे कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर 6 मे रोजी अहमदनगर जिल्ह्यातील आठवड येथील हभप. किर्तीताई महाराज दिंडे यांचे प्रवचन होणार असून, नाशिक येथील कीर्तनकार हभप. मुक्ताताई महाराज सोनवणे यांचे कीर्तन होणार आहे. तसेच 7 मे रोजी आळंदी देवाची येथील हभप. तेजश्रीताई महाराज दिंडे यांचे प्रवचन होणार असून कीर्तन संगमनेर येथील हभप. मोनालीताई महाराज गोर्डे यांचे कीर्तन होणार आहे, मंगळवार दि. 8 मे रोजी नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील हभप. माधुरीताई महाराज शेरकर यांचे प्रवचन हाणार असून, जामखेड येथील ज्ञानेश्‍वरीताई महाराज येवले यांचे कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर सप्ताहाच्या सातव्या दिवशी म्हणजेच बुधवार दि. 9 मे रोजी चिचोंडी पाटील येथील प्रवचनकार हभप. वैष्णवीताई महाज फिस्के यांचे प्रवचन होणार असुन चिचोंडी पाटील येथील वृंदावन येथे शिक्षण घेतलेल्या हभप लक्ष्मीताई महाराज खडकेे यांचे कीर्तन होणार आहे. तसेच गुरूवार दि. 10 मे रोजी सदर सप्ताहाची सांगता होणार असुन सकाळी 9 ते 11 या वेळेत आळंदी देवाची येथील भागवताचार्य हभप. आदिती देवीजी निकम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या सप्ताहामध्ये संत मुक्ताई पुण्यतिथीनिमित्त होणारा सप्ताह केवळ कुमारी मुलींचा असणार आहे. यामध्ये एकूण 11 जिल्ह्यातील 40 मुलींचा सहभाग असणार आहे. यामध्ये कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक सर्व मुलीच असणार आहेत. तरी या लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे