Breaking News

महाराष्ट्रदिनी नेवासा येथे ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे ठिय्या व धरणे आंदोलन


नेवासाफाटा - ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी 1 मे महाराष्ट्र दिनी राज्यभर धरणे व कामबंद आंदोलन करण्यात आले . नेवासा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांनी नेवासा पंचायत समिती समोरील प्रांगणात बसून शांततेच्या मार्गाने धरणे व काम बंद आंदोलन केले. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियनचे राज्य उपाध्यक्ष व नगर जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब ढोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा येथे झालेल्या धरणे आंदोलनाचे नेतृत्व ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव दिलीप डिके यांनी केले.

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना वेतनश्रेणी व पेन्शन मिळण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना गेल्या कित्येक महिन्यापासून शासन स्तरावर पाठपुरावा चालविला आहे, मध्यंतरी विविध टप्प्यात आंदोलने केले होते. याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने 2 ऑगस्ट 2017 रोजी समिती गठीत केली, या समितीला तीन महिन्यात अहवाल सादर करण्याची मुदत दिली होती, मात्र वेळकाढू धोरणाचा अवलंब करून समितीने नोव्हेंबर 2017 ला अहवाल देणे अपेक्षित असतांना मुदत संपल्यानंतर पाच महिने झाले तरी अद्यापही शासनाकडे अहवाल सादर केला नाही. यामुळे सर्व ग्रामपंचायत कर्मचार्‍यांना हक्काची वेतनश्रेणी व सेवानिवृत्ती वेतन मिळण्यास विलंब होत असल्याचे सांगत शासनाच्या या कृतीचा निषेध भाषणातून अनेकांनी केला.

यावेळी नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे संचालक सुदामराव बनसोडे, जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे विलास वाघ यांनी आपल्या भाषणातून पाठींबा दिला.
यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब गोर्डे, उपाध्यक्ष अशोक दरंदले, तालुका सचिव आप्पासाहेब पवार, ज्ञानेश्‍वर पवार, तुळशीदास दारकुंडे, संभाजी दहातोंडे, अविनाश उभेदळ, सत्तार पटेल, पांडुरंग डिके, बाळासाहेब वैरागर, राजेंद्र कार्ले, भारत लंघे, बाबासाहेब खाडे, आदिनाथ झिंजुर्डे यांच्या सह कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.