Breaking News

गुरूवारी जनसेवा फाउंडेशनच्या वतीने खर्डा येथे सर्वरोग निदान शिबीर

जनसेवा फाउंडेशन आणि पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जामखेड तालुक्यातील खर्डा येथे गुरुवारी (17) मे रोजी सर्वरोग निदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
खर्डा येथील श्री. छत्रपती कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे उद्घाटन सकाळी 9.00 वाजता पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते होणार असून, या उद्घाटन सोहळ्यास तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 


जामखेड तालुक्यातील नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व आरोग्याच्या तपासण्या करता याव्यात, असलेल्या आजारांबाबत तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने या शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
शिबिरात डोळ्यांचे विकार, अस्तीरोग, ह्रदय विकार, बालकांच्या विविध आजारांबाबत तपासण्या व उपचार केले जाणार आहेत. तालुक्यातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन जनसेवा फौंडेशन व डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटलच्या वतीने करण्यात आले आहे.