Breaking News

आश्रम शाळेस 4 क्विंटल धान्य देवून अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस साजरा

मिरजगांव येथील भारीप बहुजन महासंघाच्या वतीने अ‍ॅड. बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त नको असणार्‍या खर्चास फाटा देत येथील भाऊसाहेब आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना 4 क्विंटल धान्य देऊन एक आगळावेगळा वाढदिवस साजरा केला. 


मिरजगाव येथील बहुजन समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी एखादया व्यक्तीचा वाढदिवस कसा साजरा करावा याचा नवीन पायंडा घातला आहे. भारीप बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील तरुण कार्यकर्ते दयानंद घोडके, सुनिल गायकवाड, भगवान घोडके, नारायण घोडके, शिवाजी गायकवाड, अमोल देवळे, अभिजित घोडेस्वार, संकेत घोडके, नितीन जवणे, अशोक कळसाईत, राजु घोडके, रेखा घोडके, सरस्वती घोडकेसह आदी भिमसैनिक एकत्र येवून आपल्या नेत्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी नियोजन करत असताना त्यांच्या अचानक सुचलेल्या कल्पनेने, वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा खर्चाचा सदुपयोग करायला हवा म्हणून सर्वांनी जमा केलेल्या रक्कमचे चार क्विंटल गहू खरेदी करून मिरजगांव येथील भाऊसाहेब आश्रम निवासी शाळेतील विद्यार्थ्यांना दान केले. यावेळी आश्रम शाळेचे मुख्याध्यापक विकास तनपुरे, अनिल गायकवाड, अनिल त्र्यंबके तसेच डॉ. रमेश झरकर आदी उपस्थित होते.