Breaking News

जनसेवा फाउंडेशनचे राशिनला मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबीर

कुळधरण / प्रतिनिधी । कर्जत तालुक्यातील राशिन येथे जनसेवा फाउंडेशन आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी (15) रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अहमदनगरच्या डॉ. विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या संयोजनातुन राशिनच्या श्री जगदंबा विद्यालयात सकाळी 9 ते सायं. 4 या वेळेत हे शिबीर संपन्न होत आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हे शिबीर होणार आहे. यामध्ये अस्थिरोग, स्रीरोग, बालरोग, कान, नाक, घसा, नेत्र तसेच शल्यचिकित्साही करण्यात येणार आहे. तज्ज्ञ डॉक्टरांकडुन रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. जनसेवा फाउंडेशनच्या वतीने काही दिवसांपुर्वीच शिंदे येथे आरोग्य शिबीर घेण्यात आले. शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. तपासणी करुन निदान झालेल्या रुग्णांना आरोग्य सेवा पुरविण्यात आल्या. जनसेवा फाउंडेशनने कर्जत येथे कार्यालय सुरु केले असुन तालुक्यातील नागरिकांचे विविध प्रश्‍न सोडविले जात आहेत. आरोग्य शिबीर तसेच कार्यालयातुन रुग्णांना पुढील उपचारासाठी विळद तसेच अहमदनगर येथे पाठविले जात आहे. त्यामुळे कर्जत तालुक्यात समाजसेवेचा विखे पॅटर्न चांगलाच रुजू लागला आहे.