Breaking News

‘संजीवनी’च्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश


कोपरगांव : प्रतिनिधी 

येथील संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्स संचलित संजीवनी आर्टस, काॅमर्स व सायन्स ज्युनियर काॅलेज आणि संजीवनी सैनिकी स्कूल अॅण्ड ज्युनियर महाविद्यालयाच्या बारावीचा निकाल १०० टक्के लागला. संजीवनीने शैक्षणिक गुणवत्तेत यशस्वी परंपरा कायम ठेवली आहे, अशी माहिती संजीवनीच्यावतीने देण्यात आली.

संजीवनी ज्यु. कालेजच्या शास्त्र शाखेत वैष्णवी राजगुरू हिने ९२. १५ टक्के व काॅमर्स विभागात आदिती ठुबे हिने ९० टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला. सैनिकी विभागाच्या ज्युनिअर काॅलेजमध्ये सायन्स विभागात प्रविण शंकर वारे याने ८४ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. संजीवनी ज्यु. काॅलेजच्या सायन्स विभागात ओंकार वराडे यास ९०. ६१ टक्के व सनी गोर्डे यास ८९. ०७ टक्के गुण मिळाले. काॅमर्स विभागात सायली डांगे व अश्विनी काले यांना ८७. ६९ टक्के व शुभांगी कानकुब्जी हीला ८७. ३८ टक्के गुण मिळाले. सैनिकी विभागाच्या ज्यु. काॅलेजमध्ये गगणेश रोहीदास सदगीर यास ८२. ७७ टक्के व हितेश अजय जगतापला ७२. १५ टक्के गुण मिळाले. 

हे सर्व विद्यार्थी अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे तसेच प्राचार्य डाॅ. आर. एस. शेंडगे आणि प्रा. व्ही. एन.शेळके यांचे या यशाबद्दल संजीवनी ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूट्सचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे यांनी अभिनंदन केले.