Breaking News

महिलेची छेड काढणाऱ्या तळीरामाला बदडले


राहुरी :  शिर्डी आणि शिंगणापूरच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राहुरी बस स्थानक परिसरात एका तरुण महिला प्रवाशाची छेड काढत असलेल्या तळीरामाला येथील महिला, कालेज युवक आणि नागरीकांनी चांगलेच बदडले. आज {दि.२२} दुपारी चारच्या दरम्यान ही घटना घडली. 
राहुरी बसस्थानक परिसरात झालेल्या या घटनेमुळे महिलांच्या ला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध असलेल्या शिर्डी आणि शनिशिंगणापू या प्रसिद्ध देवस्थानच्या मध्यवर्ती व नगर मनमाड राज्य महामार्गवरील ठिकाण म्हणून राहुरी बसस्थानकाची ओळख आहे. येथे एक महिला प्रवाशी बाळाला दूध पाजत असतांना दारुच्या नशेत झिंगत असलेल्या एका ३० ते ३२ वर्षीय तळीरामाने सदर महिलेच्या पाठीमागून जाऊन अंगाला झटत तिची छेड काढली. घाबरलेल्या या महिलेने आरडओरड करताच तो मद्यपी पसार झाला. मात्र सदर घटना येथील सी सी टी व्हि कॅमेऱ्यांत कैद झाली. 

महिलेशी छेड छाड करणारा तो तळीराम दिसताच बसस्थानक सदर महिलेसह प्रमुख गोसावी, प्रदिप गलियल, काॅलेजचे युवक आणि प्रवाशांनी त्याला चांगलाच चोप दिला. यावेळी प्रवाशी आणि विक्रेत्यांची प्रचंड गर्दी झाली. दरम्यान, राहुरी बसस्थानकात पोलिस प्रशासनाने कायमस्वरुपी एक पोलिस कर्मचारी नेमावा. अन्यथा कुठलीही पूर्वसुचना न देता कालेज युवक-युवतींसह येथील प्रवाशी आंदोलन छेडतील, असा इशारा राहुरी नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आर. आर. तनपुरे आणि डाॅ. विजय मकासरे यांनी दिला.