Breaking News

२९ ला सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा : कोल्हे



कोपरगाव : येथील संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्या दशकपूर्तीनिमित्त अभिष्टचिंतन सोहळा समिती आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतीने कोपरगांव येथे दि. २९ जून रोजी सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहत आणि संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले आहे.

ज्या वधूवरांचा विवाह या सामुदायिक सोहळयात करावयाचा आहे, त्यांचा वयाचा दाखला, आधारकार्डची झेराॅक्स, रहिवासी दाखला, वधूवरांचे प्रत्येकी दोन फोटो, रेशनकार्डची झेराॅक्स, पालकांचे संमतीपत्र या कागदपत्रांसह संजीवनी पतसंस्था कोपरगांव येथे संपर्क साधावा अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 8411002750 व 9011775025 व दुरध्वनी क्रमांक (02423) 227520 वर संपर्क साधावा, ज्या वधु वरांचा वयाचा दाखला नसेल त्यांनी ग्रामीण रूग्णालयातील वैद्यकिय अधिका-यांचा वयाचा दाखला आणावा व जास्तीत जास्त इच्छुकांनी नांवनोंदणी करावी असे आवाहन षेवटी विवेक कोल्हे यांनी केले आहे. नव वधुवरांना याप्रसंगी मंगळसुत्र विवाहवस्त्र, संसारपयोगी वस्तु, विमा संरक्षण आदि पुरविले जाणार आहे.