पिंपळगांव बसवंत येथे अपघातात जवानाचा मृत्यू
नाशिक, दि. 07, मे - दुचाकीने ट्रकच्या मागील बाजूस जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जवान विशाल भोसले (वय 28 रा. संवत्सर, ता. कोपरगाव. जि. अ. नगर हे जागीच ठार झाले. शहरातील चिंचखेड रोड परिसरात हा अपघात आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान हॉटेल अजिंक्य परिसरात झाला.पोलिसांच्या माहितीनुसार, पिंपळगाव शहरातील प्रमिला लॉन्स येथून लग्न आटोपून जवान भोसले चिंचखेड चौफुली परिसरातून गावाच्या दिशेने निघाले होते. हॉटेल अजिंक्य परिसरात त्यांची दुचाकी थेट समोर चाललेल्या ट्रकवर धडकल्याने ते जागीच ठार झाले.
पिंपळगाव बसवंत पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. जवान भोसले हे आसाम येथे कार्यरत होते. चुलत भावाच्या लग्नासाठी ते 9 तारखेपर्यंत सुट्टीवर आले होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, भाऊ असा परिवार आहे. पाच महिन्यांपूर्वीच भोसलेंचे लग्न झाले होते.